मनात घुमणारं निराशेच वादळ,
पावलांचा उमटणारा पुरा असहकार
गिळंकृत करायला मिट्ट काळॊख
शांततेत लोपलेले कानातील गोंगाट
समोर उभे प्रश्न वावटळीसारखे
कदाचित नेतील उसवून मला
वाट दिसतीय दूरवर नेणारी
पण तिही अंधाराने माखलेली
हातात एक मिणमिणती पणती
पण जीव कितीसा उरलाय?
माझ्याकडे तिला द्यायला नाही
ना तेल........ना वात!!
सगळ्या अस्तित्वावऱ चढणारी काजळी
जाणवतोय काळा मिटट अंधार
बोटातून सरतय आज आयुष्य
कणाकणाने........क्षणाक्षणाने!!
असं वाटतानाच आलय कोणी
हाक देत क्षितीजाच्या पलिकडून
हातात घेऊन सळसळणार चैतन्य
माझ अस्तित्व भारून टाकणार !!
माझ्यात सामावलय आता सारं
सर्व आसमंतही भारून टाकणार
डोळ्यांच्या कडा झाल्या सोनेरी
अन हृदयात सामावलाय परमानंद !!
त्या तेजाने झळाळलय अस्तित्व
समोरची वाटही लख्ख उजळलीय
अन सामोरा येणारा क्षण-न-क्षण
या प्रकाशात मोत्यासम चमकला !!
Thursday, October 6, 2011
Tuesday, August 16, 2011
कृपादृष्टी
रवि शशी कालचक्रे
चालवित असता रहाटगाडगे
चैतन्य प्रसन्न लाल पिवळे
उधळीत रंग नित्य निराळे
मैत्र जिवाचे सख्या जोडता
हिरवे पिवळे रान सदा ते
झुळझुळ वाहतो झरा
मंजुळ गाणी गातो वारा
पशु पक्षी वृक्ष डोलती
विसाव्याला घरकुल सजती
आकाशी असे राज्य तुझे
ठेवली कृपादृष्टी धरणी माते
-सोनाली
दत्तगुरू
तो सृष्टीचा कर्ता, तो त्रॆलोक्याचा पिता,
तो कैलासाचा पती दत्तगुरू.
दत्त मायेचे आगर, दत्त सुखाचा सागर,
दत्त कृपासिंधू माय माझी.
नाम दत्ताचे स्मरता भय नसे काही,
आईच्या कुशीचे सुख भासे.
दत्त माझे गुरू दत्त कल्पतरू,
दत्त हेच बंधू आणि सखा.
कृपा त्यांची रे घडता होशी तू निवांत,
काळजी तुझी घेती दत्तगुरू.
गुरूंचे वाक्य हे ब्रीद धरी साच,
भवसागरी तारून नेतील तुज.
- सोनाली
Subscribe to:
Posts (Atom)